उदयनिधीनंतर ए. राजा बरळले

उदयनिधीनंतर ए. राजा बरळले

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : द्रमुकच्या उदयनिधी स्टॅलिननंतर ए. राजाने सनातन धर्माविरोधात वक्तव्य केले. ए. राजाने सनतन धर्माची तुलना एचआयव्हीसोबत केली. बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद यांनीही सनातन धर्माविरोधात वक्तव्य केले. टिळा लावून फिरणाऱ्यांनी देशाला गुलाम केले, असे जगदानंद म्हणाले. याआधी उदयनिधीने सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया या आजारांशी केली होती. उदयनिधी स्टॅलिन, ए. राजा आणि जगदानंद यांच्या वक्तव्यांमुळे वादाला तोंड फुटले आहे. भाजपाने सनातन धर्माविरोधातील उदयनिधी स्टॅलिनच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. उदयनिधीच्या वक्तव्याचा निषेध करण्याची हिंमत दाखवत नसलेल्या काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांवर भाजपाने कडाडून टीका केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version