दहीहंडी दरम्यान ७७ गोविंदा जखमी

दहीहंडी दरम्यान ७७ गोविंदा जखमी

मुंबई : महामुंबईसह संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. या दरम्यान ७७ गोविंदा जखमी झाले. जखमी झालेल्या गोविंदांपैकी चार गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर गोविंदांना वैद्यकीय उपचार करून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यात दहीहंडीच्या दिवशी अपघात

पुण्यात दहीहंडीच्या दिवशी अपघात झाला. दहीहंडीसाठी लावलेले हँगिंग लाईट कोसळले. यामुळे झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले. गणेश पेठेत दहीहंडीची तयारी सुरू असताना हा अपघात झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version