इगतपुरीत पाऊस पण उर्वरित नाशिकमध्ये पावसाचा अभाव

इगतपुरीत पाऊस पण उर्वरित नाशिकमध्ये पावसाचा अभाव

इगतपुरी, ७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिकच्या इगतपुरी शहरात पावसाने मध्यरात्री पासून हजेरी लावली. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. रात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. पाऊस जर असाच सुरू राहिला तर करपण्याच्या मार्गावर असलेल्या भात शेतीस संजीवनी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

नाशिक जिल्ह्यात सध्या ७९.४७ टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी यावेळी नाशिक जिल्ह्यात ९७.५५ टक्के पाणीसाठा होता. यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात १७ टक्के पाण्याची तूट आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडलेला नाही. निवडक भाग वगळता उर्वरित नाशिक जिल्हा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी खरीप पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version