पुण्यात पाच अल्पवयीन मुलांकडून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

पुण्यात पाच अल्पवयीन मुलांकडून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

पुणे, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी संबधीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक ते तीनच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे.

महादेव रघुनाथ मोरे असे मृत तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी याप्रकरणामध्ये ५ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव आणि अल्पवयीन ५ मुले एकमेकांना आधीपासून ओळखत होते. यातील एक मुलगा शाळेत शिक्षण घेत आहे. तर इतर मुले रोजदारीने काम करुन आपलं पोट भरतात. तर हत्या झालेला महादेव हा एक खासगी कंपनीत कामाला होता.

काही दिवसांपूर्वी ही सर्व मुलं आणि महादेव भेटले. त्यावेळी किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. मुलांनी या गोष्टीचा राग आला. त्यांनी आपल्या मनात राग धरत पुन्हा महादेवची भेट घेतली. यावेळी हे सर्वजण रामटेकडी परिसरातील ढेरे कंपनीजवळ डोंगरावर मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी गेले. तिथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामरीत होऊन मुलांनी त्याला मारहाण करत दगडाने ठेचले आणि हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version