चांद्रयान ३ च्या यशानंतर इसरो सुर्याच्या दिशेनं पाऊल

चांद्रयान ३ च्या यशानंतर इसरो सुर्याच्या दिशेनं पाऊल

मुंबई, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा एकमेव देश म्हणून भारताने आपली ओळख निर्माण केलीये. आता या यशानंतर एका आठवड्यात म्हणजेच २ सप्टेंबरला इसरो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सौर मोहीम सुरू करण्याच्या तयारीत आहे. अहमदाबाद स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम देसाई यांनी माध्यमांना ही माहिती दिली. आदित्य एल १ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ आधारित भारतीय प्रयोगशाळा असेल. सूर्याभोवती घडणाऱ्या घटनांच्या दूरस्थ निरीक्षणासाठी त्याची रचना करण्यात आलीये.

आदित्य यान सूर्य-पृथ्वीच्या एल १ बिंदूवर राहून सूर्यावर उद्भवणारी वादळे समजून घेईल. हा बिंदू पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूर आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १२० दिवस म्हणजे ४ महिने लागतील. गगन यान हे विविध वेब बँड्सच्या सात पेलोड्सद्वारे लॅग्रॅन्गियन बिंदूभोवती परिभ्रमण करेल, फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सर्वात बाहेरील थर याची चाचणी करेल.

इस्रोच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य एल १ हा देशाच्या संस्थांच्या सहभागाने पूर्णतः स्वदेशी प्रयत्न आहे. बंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (आयआयए) दृश्यमान उत्सर्जन लाइन कोरोनाग्राफने त्याचे पेलोड तयार करण्यात आलंय. तर इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स पुणेने या मोहिमेसाठी सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजर पेलोड विकसित केले आहे. यूव्ही पेलोडचा वापर सुर्या भोवतीचे वातावरण म्हणजेच कोरोना आणि सौर क्रोमोस्फियर पाहण्यासाठी केला जाईल, तर एक्स-रे पेलोडचा वापर सूर्याच्या फ्लेअर्स पाहण्यासाठी केला जाईल. पार्टिकल डिटेक्टर आणि मॅग्नेटोमीटर पेलोड चार्ज केलेल्या कणाच्या प्रभामंडल कक्षेत पोहोचणाऱ्या चुंबकीय क्षेत्राविषयी माहिती देईल.

आदित्य यानाला सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेल्या हॅलो ऑर्बिटमध्ये ठेवण्यात येणार आहे. इस्रोचे म्हणणे आहे की एल१ बिंदूभोवती प्रभामंडल कक्षेत ठेवलेला उपग्रह कोणत्याही ग्रहणाशिवाय सूर्याला सतत पाहू शकतो. याच्या मदतीने रिअल टाईम सोलर अ‍ॅक्टिव्हिटी आणि अवकाशातील हवामानाचेही निरीक्षण करता येईल. आदित्य एल १ चे पेलोड्स कोरोनल हीटिंग, कॉरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियाकलापांची वैशिष्ट्ये, कणांची हालचाल आणि अवकाशातील हवामान समजून घेण्यासाठी माहिती प्रदान करणे अपेक्षित आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version