पाताळगंगा एमआयडीसीला मोठी आग

पाताळगंगा एमआयडीसीला मोठी आग

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील कैरे गावाजवळच एका कंपनीच्या गोदामात आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे. शर्मा वेअर हाऊस कंपनीच्या गोदामात ही आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर खोपोली नगरपालिका, रिलायन्स आणि टाटा कंपन्यांचे फायर फायटर घटनास्थळी दाखल झालेले आहेत. पण आगीच्या ज्वाळांचे लोट इतके तीव्र आहेत की आणखी काही फायर फायटर मागविण्यात आले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version