मुंबई ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत थेट उपमुख्यमंत्री पदाशी शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख ठाण्याचा पठ्ठ्या असा केला होता. आता आव्हाड यांच्या वाढदिवसाच्या बॅनवरुन त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. हा पठ्ठ्या साहेबांशी निष्ठावान असल्याचे या बॅनरमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पूर्ण ठाणे शहरात शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, या बॅनरवर त्यांनी अजित पवार यांना टोला मारल्याचे दिसून येत आहे.
‘ठाण्याचा पठ्ठ्या साहेबांशी निष्ठावान आहे, होता आणि मरेस्तोवर राहणार’ अशा आशयाची बॅनरबाजी ठाणे स्टेशन परिसरात करण्यात आली आहे. बॅनरवर जितेंद्र आव्हाड यांचा निष्ठावंत लोकनायक असा उल्लेख करत विरोधकांसह अजितदादा गटातील कार्यकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.