माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ह्रदयविकाराचा झटका

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ह्रदयविकाराचा झटका

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका बसला आहे. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी गेले असताना त्यांना सौम्य झटका आला. यानंतर जाधव यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजते. नवी दिल्लीतल्या आर एम एल हॉस्पिटल मध्ये जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी मार्च महिन्यात भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केलाय.

हर्षवर्धन जाधव हे काही कामानिमत्ताने दिल्लीत आले होते. दिल्लीत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी असतानाच हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर लगेचच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले आहे. जाधव यांनी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. सध्या जाधव यांची प्रकृती स्थिर आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version