नौपाडा परिसरातील इमारतीचं छत कोसळलं

नौपाडा परिसरातील इमारतीचं छत कोसळलं

ठाण्यातील भास्कर कॉलनी येथील अमर टॉवरच्या सात मजली इमारतीचा पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. यात तीन ते चारजण जखमी झाले, तर इमारतीत राहणाऱ्या ३३ कुटुंबांना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्थलांतरित करण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल, नौपाडा पोलीस आणि महापालिका कर्मचारी सदर घटनास्थळी सर्व अधिकारी उपस्थित झाले होते.

सदर घटनास्थळी अडकलेल्या ५ लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील ०३ व्यक्तींना दुखापत झाली आहे. दुखापत झालेल्या व्यक्तींना उपचाराकरिता पराडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेत रूम नं. १०१ चा स्लॅब कोसळल्याने तळमजल्यावरील रूम नं. ०१ (मालक – राजा जोशी) च्या स्लॅबलाही काही प्रमाणात तडे गेले असून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्याची कार्यवाही सुरू आहे.

दुखापत झालेल्या व्यक्तींची नावे:-
प्रथमेश सूर्यवंशी – २८ वर्षे
विजया सूर्यवंशी – ५४ वर्षे
अथर्व सूर्यवंशी – १४ वर्षे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version