‘आमची चूक झाली’

‘आमची चूक झाली’

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील गुरुवारी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष पदाचा दिलेल्या राजीनाम्याचा उल्लेख करत झालेल्या चुकीबद्दल मोठं विधान केलं.

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर बोलताना अजित पवार म्हणाले,
“गेल्या वर्षी जूनमध्ये घटना घडल्या आणि त्यानंतर बऱ्याच राजकीय उलथापालथ झाली. त्याबद्दल अनेकांनी कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण सुरू होतं. आपल्याला आठवत असेल की, हा निकाल यायच्या आधी मी लातूरच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी माध्यमांना सांगितलं होतं की, १६ आमदारांचा निर्णय देण्याचा हा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येईल. तशाच पद्धतीने घडलं. ज्यावेळी असा प्रसंग निर्माण होईल. त्यावेळी याचा दाखला दिला जाईल आणि पुढच्या गोष्टी घडतील.

यामध्ये आमचे त्यावेळचे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना न विचारता दिला. राजीनामा दिल्यावर सांगितलं की राजीनामा दिला. तो द्यायला नको होता, पण दिला. या घटना घडल्या की त्यांनी तातडीने ते पद भरण्याचा प्रयत्न केला. बहुमत त्यांच्याकडे होतं आणि पद भरलं. ते पद भरलं नसत, तर त्याच विधानसभा अध्यक्षांनी १६ लोकांना अपात्र केलं असतं”, असं म्हणत झालेल्या चुकीवर अजित पवारांनी भूमिका मांडली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version