राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते असले तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा थेट निशाणा उद्धव गटाने सामना अग्रलेखातून शरद पवारांवर साधला आहे. यावरुन मविआला तडा जाणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकर दिलं आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मग संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. राऊतांना असे वाटत का, राष्ट्रवादीने मविआतून बाहेर पडायला पाहिजे. मनभेद निर्माण व्हावेत, असा प्रश्न भुजबळांनी विचारला आहे.
शरद पवार यांनी लोक माझे सांगाती पुस्तकात जे म्हणले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. तरीही संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे. त्यांना काय अडचण आहे? त्यांना असे वाटत का, राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे. मनभेद निर्माण व्हावेत, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
तुमचं जेवढ आयुष्य आहे तेवढं शरद पवार साहेबांचं राजकारण आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत. राऊत कुणाच्या घरात गेले होते त्यांनाच माहिती. दरम्यान संजय राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे गट आणि त्यांच्या बॅगांवर ठेवलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. राष्ट्रवादीमध्ये सुद्ध अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे अनेकजण नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.