भिवंडीत इमारत दुर्घटना

भिवंडीत इमारत दुर्घटना

भिवंडीत अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. भिवंडीत वलपाडा परिसरात ३ मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकले असून, या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलं आहे. अग्निशम दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरु आहे. इमारतीचा ढिगारा उपसला जात असून त्याखालून लोकांना काढलं जात आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. ही इमारत जुनी असल्याचं सांगितलं जात आहे.

भिवंडीत वलपाडा परिसरातील ही इमारतीचे आहे. या इमारतीच्या खाली गोडाऊन होता. तर इमारतीच्या वरच्या तिन्ही मजल्यावर लोक राहत होते. या गोदामात ३० ते ३५ लोक काम करत होते. दुपारी अचानक इमारती कोसळली आणि हे सर्व कामगार इमारतीखाली गाडले गेल्याचं सांगितलं जातं. तसेच दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसाला पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मात्र, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २२ दबल्याची माहिती समोर आली असून ११ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version