उद्धव गटाचं तळ्यात मळ्यात

उद्धव गटाचं तळ्यात मळ्यात

महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरीसाठी पत्र दिले होते. आज अचानक महाविकास आघाडीतील नेते विरोध करु लागले आहेत, हा दुटप्पीपणा आहे. स्थानिकांचा नाही, काही लोकांचा विरोध आहे. एकीकडे पत्र द्यायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा, हा दुटप्पीपणा असल्याचा घणाघात उदय सामंत यांनी केला आहे.

उदय सामंत म्हणाले की, नानार रद्द करण्यात आम्ही देखील होतो. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनी दिले होते. साडे नऊचा इव्हेंट करणारे म्हणतात की रिफायनरी होणार नाही. एकीकडे पत्र द्यायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे. आंदोलन करुनच मी देखील इथपर्यंत पोहोचलो आहे. स्थानिकांचा नाही, मात्र काही लोकांचा विरोध आहे. ज्याला मला भेटायचं आहे, त्यांना मी भेटेन. उद्योगमंत्र्यांना जाळून टाकू असं जे म्हणत आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणाल? असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला आहे. जसे संघर्षवाले आहेत, तसेच समर्थक देखील आहेत. चुकत असेल तर आम्हाला सूचित करा, विरोधकांना कळलं की आंदोलन होत नाही, म्हणून हे सुरु आहे. प्रसारमाध्यमांनी देखील काही ठिकाणी आम्हाला सहकार्य करणं महत्वाचं असल्याचे आवाहन यावेळी उदय सामंत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव यांनी पत्रात काय लिहिलं –

नाणार इथे होणारा प्रकल्प बारसू इथे करावा.
या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.
महाराष्ट्राला या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा फायदाच होणार आहे.
या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नात ८ पूर्णांक ५ टक्के इतकी वाढ होणे अपेक्षित आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version