योगींना जीवे मारण्याची धमकी

योगींना जीवे मारण्याची धमकी

लखनऊ, २५ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना २३ एप्रिलला रात्री एका अज्ञात व्यक्तीकडून दूरध्वनीवरून संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ११२ या नंबरवरुन एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. योगी आदित्यनाथ यांना दुसऱ्यांदा धमकी आली आहे आहे. जेव्हा हा मेसेज आला तेव्हा योगींची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि या धमकीची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करुन गुन्हा देखील नोंदवण्यात आला. कलम ५०६ आणि ५०७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कलम ६६ लावण्यात आले आहे. लखनऊ मधील पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी गंभीर्याने दखल घेतली असून कसोशीने या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version