बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीते रविवारी (२३ एप्रिल) जाहीर झाली आहेत. सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे.
मात्र भेंडवळची ही घट मांडणी आता वादात सापडली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ही भाकिते मांडणाऱ्या वाघ महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भेंडवडची घटमांडणी आता वादात सापडली आहे. भेंडवळची घट मांडणी हे एक थोतांड असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आला आहे. मागील वर्षी केलेली सर्व भाकिते फोल ठरली असल्यासही अनिस कडून सांगण्यात आलंय. त्यामुळे भेंडवडच्या या घट मांडणीला कुठलाच वैज्ञानिक आधार नसून त्या महाराजांना नीलावती विद्या प्राप्त असल्याचं सांगितलं जातंय ते सुद्धा साफ खोट असल्याचं अनिस कडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आता अनिसच्या भूमिकेमुळे भेंडवडच्या घट मांडणी करणाऱ्या वाघ बंधूंवर कारवाई होईल का हे पहावं लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.