आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. शनिवारी पंढरपुरात मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. यावेळी मराठी समाजाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच सरकारचा पुतळाही जाळला. यावेळी, न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडलं असल्याचा आरोप मराठा समाजाने केला. पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं.

पंढरपुरात मराठी समाजाने राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला. यावेळी पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणाही मराठा समाजाकडून देण्यात आल्या. राज्य सरकारने मराठा समाजाच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यावे, अशी मागणी मराठा समाजाने केली. मराठा आरक्षण न मिळाल्यास पंढरपुरातील शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदेंना करू देणार नाही, असा इशारा मराठा समाजाने केला आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकारने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने राज्य सरकारची याचिका अमान्य करत फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा अधांतरी असल्याचं दिसून येत आहे.

‘सरकार पुन्हा न्यायालयात जाणार’

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. तसेच पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून ज्या गोष्टी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयासमोर मांडता येऊ शकल्या नाहीत त्या गोष्टी क्युरेटिव्ह याचिकेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडता येणार असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version