‘शिंदे सरकार बरखास्त करा’

‘शिंदे सरकार बरखास्त करा’

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी झालेले मृत्यू उष्माघाताचे नसून, ते चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. त्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे हे सरकार बरखास्त करावे, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

नवी मुंबईतल्या खारघर येथे डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. मात्र, या सोहळ्यात आलेल्या १४ श्री सेवकांचा मृत्यू झाला. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत आहे.

पटोलेंचा दावा काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच हा व्हिडिओ महाराष्ट्र भूषण सोहळ्यातल्या असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. त्यात चेंगराचेंगरी झाल्याचे दिसते असून त्यामुळे काही जणांचा जीव गेल्याचे समजते. हा व्हिडिओ ट्विट करून नाना पटोले म्हणतात की, “महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमुळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय?” हा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केलं आहे.

तसेच नाना पटोले पुढे म्हणतात की,”या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version