‘आमची विचारधारा मान्य केली तर स्वागत’

‘आमची विचारधारा मान्य केली तर स्वागत’

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तरच त्यांचे स्वागत करू. अन्यथा, शिवसेना सत्तेबाहेर पडेल, असे महत्त्वाचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे.

अजित पवार राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन करणार, अशी एकच चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू होती. त्यावर संजय शिरसाटांनी पत्रकार परिषदेत आमदार संजय शिरसाट यांनी भूमिका मांडली.

पत्रकार परिषदेत शिरसाट म्हणाले,
अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे होऊन आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे. परंतु त्यांना आमच्यासोबत यायचं असेल तर आमची विचारसरणी मान्य करावी लागले. मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भाजपसोबत गेले तर शिंदे गट अर्थात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असंही शिरसाट यांनी नमूद केलं.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version