जयच्या टॅटूमागे दडलंय काय ?

जयच्या टॅटूमागे दडलंय काय ?

मुंबई: बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेला जय दुधाणे अल्पावधीतच खूप प्रसिद्ध झाला. बिग बॉस नंतर ही त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कायम आहे. आपल्या फिटनेस सह हातावरील टॅटूमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.तर नुकतेच आपल्या चाहत्यांची ही उत्सुकता जयनं सोशल मीडियावर पोस्ट करत शमवली आहे.

अभिनेता जय दुधाणे याने सोशल मीडियावरून चाहत्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यावेळी एका चाहत्यानं जयला विचारलं की,’ तुझ्या हातावर असलेल्या टॅटूबद्दल तू काय सांगशील ?’ यावर उत्तर देत जय म्हणाला की, ‘हा एक जबरदस्त टॅटू आहे. हा टॅटू मी अत्यंत स्ट्राँग व्यक्ती असल्याचं दर्शवतो. तसंच माझ्या मार्गात येणारी संकट, येणारे चढ-उतारांना मी समर्थपणे सामोरे जाऊ शकतो हे सांगते. उलट आणि सुलट असे त्रिकोण मी माझ्या आयुष्यात किती स्थिर आहे हे दाखवतात.’ असं उत्तर देत जयनं शेवटी #storyofmylife हे हॅशटॅगही वापरले आहे. त्यानंतर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असताना जय ने तो आगामी कलावती या मराठी सिनेमात काम करत नसल्याची माहिती दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version