मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता, गायक आणि संगीतकार दिलजीत दोसांज याचे चाहते जगभरात पसरलेले आहेत.अल्पावधितच स्वत:ची ओळख निर्माण करणारा पंजाबी गायक दिलजीतच हा त्याच्या आवाजासाठी आणि वक्तव्यासाठी ओळखला जातो. पंजाबपासून ते बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत दिलजीतच्या आवाजाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते . नेहमीच चर्चेत असणाऱ्या दिलजीतने नुकतेच कॅलिफोर्नियातील कोचेला म्युझिक फेस्टिव्हलमध्ये लाईव्ह परफॉर्म केले. विशेष म्हणजे वार्षिक यूएस म्युझिक अँड आर्ट फेस्टिव्हलमध्ये स्टेजवर परफॉर्म करणारा दिलजीत दोसांझ हा पहिला पंजाबी कलाकार आहे. कॅलिफोर्नियातील कोचेला म्युझिक फेस्टिव्हलमध्ये दिलजीतशिवाय पाकिस्तानी गायक अली सेठीनेही परफॉर्म केले.
सध्या दिलजीतच्याया परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विषेश म्हणजे दिलजीतने या परफॉर्मरन्ससाठी भारतीय पोशाख परिधान केला होता. तो काळ्या कुर्ता-तंबामध्ये दिसला. त्याचा देसी लूक तेथील लोकांना आवडला होता. दिलजीतचा हा वायरल विडिओ पाहून बॉलिवूड स्टार्सनी त्याचे अभिनंदन केले आहे. सोनम कपूर, करीना कपूर खान आणि आलिया भट्ट यांनी त्याचे कौतुक केले आहे.
गाण्याव्यतिरिक्त दिलजीतने पंजाबी तसेच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘चमकिला बायोपिक’ या चित्रपटामुळेही बराच चर्चेत आहे. या चित्रपटात दिलजीतसह अभिनेत्री परिणीती ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे .
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.