बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा

बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण असून भाजप नेते देखील सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधींना धमकी वजा इशारा दिला आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे.

‘स्वा. सावरकरांचा राहुल गांधी यांनी पाच वेळा अपमान केला. त्यांनी ही भूमिका अद्यापही बदलली नसून त्यांनी माफीही मागितली नाही. ते माफी मागण्याच्या मनस्थितीत नाही.” उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांची माफी मागावी.

सावरकरांची ज्याप्रकारे अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. एकदाच नाही तर पाच वेळा जाणीवपूर्वक स्वा. सावरकर यांचं नाव घेऊन टीका केली. सावरकर यांच्याबद्दल तुम्ही बोलू नका, असं त्यांना अनेकांनी वारंवार समजावलं. तुमची ती उंची नाही आहे. तरीही त्यांनी अपमान केला. महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा.

दरम्यान वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे यांनीही इशारा दिला होता. वीर सावरकरांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाहीत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत फूट पडणार अशी शक्यता होती. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मध्यस्थी केली आणि काँग्रेस सावरकरांचा मुद्दा पुन्हा मांडणार नाही, असे आश्वास दिले. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे. अशातच आता राहुल गांधी थेट मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे संपूर्ण राज्याचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version