मुंबईत नवे खासगी कला केंद्र

मुंबईत नवे खासगी कला केंद्र

मुंबई हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते यात सांस्कृतिक शहरात अनेक सांस्कृतिक वास्तूंचा ठेवा आहे अशीच एक सांस्कृतिक वास्तू वांद्रे कुर्ला संकुलात उभी राहणार असून अंबानी उद्योग समूहाच्या माध्यमातून भव्य अशी वास्तू वांद्रे कुर्ला संकुलात उभी राहत आहे. या वास्तूच्या माध्यमातून प्रसिद्ध फॅशन डिझायनर्स यांनी डिझाईन केलेले अनेक कपड्यांचे प्रदर्शन त्याचप्रमाणे बॉलीवूड मधील प्रसिद्ध असलेले ड्रेसेस आणि संगीत प्रेमींसाठी ऑडिटोरियम च्या माध्यमातून एक प्रेक्षणीय वास्तू उभी राहत आहे.

नीता-मुकेश अंबानी कल्चरल सेंटर ‘द ग्रँड थिएटर’चे दरवाजे लवकरच प्रेक्षकांसाठी खुले होणार आहेत. दोन हजार प्रेक्षक त्यात बसू शकतील. हे द ग्रँड थिएटर १६,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आर्ट हाऊस असेल. ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ हे मुंबईच्या स्वप्नांच्या शहरात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये बांधले जात आहे. हे लवकरच केंद्र अभ्यागतांसाठी खुले केले जाणार आहे.

‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ मध्ये परफॉर्मिंग आणि व्हिज्युअल आर्ट्सचे प्रदर्शन करणारी तीन मजली इमारत असेल. कला सादर करण्यासाठी ‘द ग्रँड थिएटर, द स्टुडिओ थिएटर आणि द क्यूब’ सारखी भव्य थिएटर्स बांधली गेली आहे. या सर्वांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ‘द ग्रँड थिएटर’मध्ये दोन हजार प्रेक्षकांना एकाच वेळी कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या प्रदर्शनासाठी १६,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले चार मजली आर्ट हाऊसही सुरू करण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version