‘एकजूट ठेवा, निवडणुका जिंकू’

‘एकजूट ठेवा, निवडणुका जिंकू’

महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांची काल बैठक पार पडली. सत्ताधारी पक्षांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी आतापासूनच लोकसभा निवडणुकीतील जागावाटप निश्चित झाल्यास त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवारांना प्रचारात मिळेल यादृष्टीने आघाडीच्या बैठकीत जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली.पोटनिवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. या फॉर्म्युल्यानुसार ४८ जागांपैकी उद्धव गटला २१, राष्ट्रवादी काँग्रेस १९ तर काँग्रेसला ८ जागा मिळणार आहेत. या जागा कोणत्या असतील हेही आघाडीचं ठरलं असल्याचं सांगितलं जात आहे. या शिवाय आपापल्या मित्रपक्षांना स्वतःच्या कोट्यातून जागा द्याव्यात असंही महाविकास आघाडीचं ठरलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला ठाकरे गटाच्या कोट्यातून जागा मिळणार आहे. वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळणार नसल्याचं सध्याचं तरी चित्रं असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबई आणि उपनगरमधील लोकसभेच्या सहा जागांपैकी शिवसेनेला चार जागा देण्याबाबत चर्चा झाली. उर्वरित दोन जागांपैकी एक काँग्रेसला, तर एक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असल्याचे समजते. काँग्रेसने उत्तर मुंबई, तर राष्टवादी काँग्रसने ईशान्य मुंबई लढवावी अशाप्रकारचा प्रस्ताव बैठकीत मांडला गेल्याचं सांगितले जात आहे.

राज्यात २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीमधील घटक पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, तर काँग्रेसचा केवळ १ खासदार निवडून आला होता. यासर्व पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत झालेल्या चर्चेत शिवसेनेला २१ जागा देण्याबाबत चर्चा झाली. भाजप आणि शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांमध्ये हिंदुत्व हा एक समान धागा असल्याने भाजपला मात देण्यासाठी शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे जागावाटपात त्यांना जास्त जागा देताना, त्यांच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद उभी राहिल्यास त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा या बैठकीत झाली असल्याचं सांगितलं जातं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version