दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना काल सीबीआयने कथित मद्य परवाना घोटाळ्या प्रकरणी अटक केली आहे. अटकेपूर्वी सीबीआयने त्यांची ८ तास चौकशी केली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या एका आयएएस अधिकाऱ्याने चौकशीदरम्यान सिसोदिया यांचे नाव घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, रविवारी चौकशीत सहभागी होण्यापुर्वी सिसोदिया रोड शो करत ते सीबीआय कार्यालयात पोहोचले होते. यावेळी सिसोदिया यांच्यासोबत त्यांचे हजारो समर्थक होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यामागे सीबीआयचा सिसेमिरा लागला होता. त्यानंतर आता सीबीआयने त्यांना अटक केली आहे. सिसोदिया यांना सीबीआयने गेल्या रविवारी समन्स बजावले होतं.
रविवार चौकशीच्या आधी मनीष सिसोदिया यांनी शक्यता वर्तवली होती की, त्यांना अटक केली जाऊ शकते. त्याचबरोबर सिसोदिया यांनी शंका व्यक्त केली होती की, त्यांना ७ ते ८ महिन्यांचा कारावास होऊ शकतो. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले होते व त्यानंतर राजघाटवर गेले होते. राजघाटवर सिसोदिया महात्मा गांधींच्या समाधीवर नतमस्तकझाले होते. घरातून बाहेर पडताना सिसोदिया यांनी हसत हसत विजयी चिन्ह दाखवले होते.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘मनीष देव तुझ्या पाठीशी आहे. लाखो मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. देशासाठी आणि समाजासाठी तुरुंगात गेल्यावर तुरुंगात जाणे हा दुर्गुण नसून गौरव आहे. तुम्ही लवकरच तुरुंगातून परत येवो, अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. दिल्लीची मुले, पालक आणि आम्ही सर्व तुमची वाट पाहत आहोत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.