विद्यार्थी बसलेल्या ट्रॅक्टरचा थरारक अपघात

विद्यार्थी बसलेल्या ट्रॅक्टरचा थरारक अपघात

विद्यार्थी बसून जात असलेल्या ट्रॅक्टरला अपघात झाला आहे. या अपघातात २५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने दर्यापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये जे.डी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आटोपून विद्यार्थी ट्रॅक्टरने परतत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात असलेल्या नामांकित जे. डी .पाटील महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील जेनपुर येथे राष्ट्रीय सेवा शिबीर सुरू होते. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या शिबिराचा आज शेवटचा दिवस होता. शिबीर संपल्यानंतर सर्व विद्यार्थी कॉलेजच्या वतीने भाड्याने घेतलेला ट्रॅक्टर करून दर्यापूरकडे निघाले. विद्यार्थी हे ट्रॅक्टरने दर्यापूरच्या दिशेने येत असताना जेणपुर येथे ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो तोल जाऊन पलटी झाला.

महाविद्यालयाच्या वतीने या निष्क्रिय कारभाराचा आता विद्यार्थ्यांचे नातेवाईकांकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे. तर विद्यार्थ्यांना शिक्षकांविना ट्रॅक्टरमधून प्रवास का करावा लागला? ट्रॅक्टर चालक पूर्ण शिकलेला होता का? याची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. महाविद्यालयाकडून अशा निष्क्रिय कारभाराविरोधात आता वरिष्ठ पातळीवर अधिकारी दखल घेणार काय हे पाहणे योग्य ठरणार आहे.

कसा झाला अपघात ?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version