गुंडच करणार राऊतांविरोधात तक्रार

गुंडच करणार राऊतांविरोधात तक्रार

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिस आयुक्तांना लिहलेल्या पत्रात गुंड राजा ठाकूरचा उल्लेख केला आहे. या पत्रावर फडणवीसांनी राऊतांची खिल्ली उडवली. राऊत हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचे दावे करत असल्याचं फडणवीसांचं म्हणणे आहे. तर दुसरीकडे राऊतांनी ज्या गुंडाचा उल्लेख केलाय त्याने आपण राऊतांविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचे म्हटल आहे.

ठाण्यातील, गुंड राजा ठाकुर याला सुपारी देण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजा ठाकूरला आपल्यावर हल्ला करण्याची जबाबदारी दिली असल्याचा आरोप राऊतांनी केला. यानंतर आता राजा ठाकुर याने संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ते आरोप खोटे असल्याचं ठाकूर म्हणतो. याशिवाय आपण संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचं राजा ठाकूरने सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version