‘संजय राऊत निर्बुद्ध’

‘संजय राऊत निर्बुद्ध’

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातला संघर्ष आणखी पेटला असताना सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांपासून दोन हजार कोटींच्या ‘पॅकेज’बाबत दावा करून शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप सुरू केलाय. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडीसतोड उत्तर दिलंय.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी २००० कोटी रूपयांचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात कधी वर जातो कधी खाली जातो, पण इतकं निराश होऊन मनात जे येईल काही बोलायचं, यातून लोकं त्यांच्या बुद्धीची कीव करतात. त्यांच्या बोलण्याने काहीच परिणाम होत नाही. तसंच संजय राऊत जे बोलले ते निर्बुद्धपणे बोलतात, अशा निर्बुद्ध लोकांना काय उत्तर देणार? असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. कालपासून हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. परीक्षा पद्धतीची नवी प्रणाली २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय जाहीर करा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. सरकारने फक्त निर्णय दिला असून जीआर आला नाही, असा आरोप हे विद्यार्थी करत आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विद्यार्थी हे आपलं भविष्य आहे. त्यामुळे त्यांची निराशा करून चालणार नाही. याबाबत योग्य निर्णय राज्य सरकारने एमपीएससी आयोगाला कळवला होता. यावर नवीन प्रणाली यावर्षीच लागू केला पाहिजे, असं एमपीएससीच्या फुल कोरमतर्फे सरकारला कळवंल होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा विचार करा, असं पत्रच लिहिलं होतं. जर यावर एमपीएससी आयोगाने यावर पुर्नविचार केला नाही तर न्यायालयात जाण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version