उद्धव ठाकरे निघाले कोकणात

उद्धव ठाकरे निघाले कोकणात

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जात आहेत. शिवसेनेत संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. मुंबई शहर,पश्चिम आणि पूर्व उपनगरातील विभागप्रमुखांना बदलण्यात आले आहे. संघटनाबांधणीवर लक्ष केंद्रीय करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर जात आहेत. उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा होणार आहे.

उद्धव ठाकरे यांची 5 मार्चला खेडमध्ये जाहीर सभा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील महिन्यात कोकण दौऱयावर जाणार आहेत. 5 मार्च रोजी रत्नागिरी जिह्यातील खेडमध्ये होळी मैदान येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे कोकणातील जनतेचे लक्ष लागले आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे स्वत: जातीने लक्ष घालत आहेत. ठाकरे यांची तब्बेत बरी नसल्याने त्यांनी महाराष्ट्राचा दौऱ्या टाळला होता. आता त्यांनी नव्याने पक्षबांधणीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोकणातील शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राहण्यासाठी पक्षबांधणीकडे लक्ष दिले जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version