निवडणूक आयोगाने आता पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला दिल्याने शिंदे गट सक्रिय झाला आहे. शिवसेनेच्या सर्व आस्थापना आणि पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा आज शिंदे गटाने घेतला आहे. बंडखोरी झाल्यावर हे पक्ष कार्यालय कुणाचे हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाचा निकाल या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. हा निर्णय येताच शिंदे गटाने शिवसेनेच्या ताब्यातील पक्ष कार्यालय आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदारांनी विधिमंडळात प्रवेश केला. आणि त्याठिकाणी असलेले शिवसेनेचं कार्यालय आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेनेचं विधानभवनातील कार्यालय सुद्धा गेलं आहे. दरम्यान, विधीमंडळ कार्यालयापाठोपाठ मंत्रालयासमोरील शिवालय कार्यालय सुद्धा शिंदे गट आपल्या ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.