शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना बांधणीच्या काळात एकाप्रसंगी कारच्या टपावर उभे राहून भाषण केले होते. आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काळया रंगाच्या सनरुफ कारमधून भाषण केले.
शिवसैनिकांशी संवाद साधताना आज ठाकरे भावूक झाल्याचे देखील दिसून आले, ठाकरे म्हणाले आज तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, मात्र मी खचलेलो नाही, खचणार नाही, आज पासूनच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना यावेळी केले.
शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे गट देखील आता मोर्चेबांधणीला लागला असून आज त्यांनी आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांची बैठक देखील तातडीने बोलावली आहे. त्याच दरम्यान मातोश्रीवर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कारच्या सनरुफमधून शिवसैनिकांना संबोधीत केले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी कारच्या बोनेटवरून भाषण केल्याचा प्रसंग आठवला. यावेळी ठाकरे म्हणाले, आपण पुन्हा एकजूटीने लढू, चोरांचा नायनाट करु, शिवसेना संपवता येणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.