शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदेंना

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदेंना

शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाने चिन्हाची लढाई जिंकली असून धनुष्यबाण चिन्ह देखील एकनाथ शिंदेंनाच देण्याचा निर्णय निवडणूक आयोगामार्फत घेण्यात आला आहे. या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना गेली आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version