‘अजित पवारांना ४४० व्होल्टचा शॉक द्या’

‘अजित पवारांना ४४० व्होल्टचा शॉक द्या’

दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचम स्वप्न व संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध करायला हवी होती. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह मी स्वत आघाडीच्या नेत्यांना एकदा नाही,तर पाचवेळा विनंती केली. पण,आघाडीनं बेईमानी केली. त्यामुळे 26 फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा, अजित पवारांना 440 व्होल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की पुन्हा त्यांनी चिंचवडचे नावच घेऊ नये, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगतापांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांवर निशाणा साधला. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर केली आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.

भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनंही जोरदार कंबर कसलेली आहे. आज चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची यंग ब्रिगेड मैदानात उतरणार आहे.

बावनकुळे म्हणाले, “अश्विनी जगताप यांच्या नशिबाची तसेच त्यांच्या भावनेची ही निवडणूक नसून ती चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे स्वप्न आणि संकल्प पूर्तीची ती आहे. सांगवीत दिवंगत आ. जगताप यांची भावकी विरोधी पक्ष म्हणजे राष्ट्रवादीत आहे. हा धागा पकडून अशा काही गोंधळलेल्या भाऊ,बहीण मतदारांकडे जावा आणि त्यांना भाजपमध्ये आणा असं” सूचक आवाहन त्यांनी यावेळी केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version