राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ आणि मुंबई विभागीय मंडळाकडून दिरंगाई केली जात असल्याच्या निषेधार्थ शिक्षण मंडळाच्या वाशी येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ आणि मुंबई विभागीय मंडळाकडून दिरंगाई केली जात असल्याच्या निषेधार्थ शिक्षण मंडळाच्या वाशी येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून शिक्षकांना वेतन सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा शालार्थ क्रमांक लवकर दिला जात नसल्याने शिक्षकांचे पगार सुरू होत नाहीत या विरोधात शिक्षकांनी आवाज उठवत मोर्चा काढला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.