बदलत्या हवामानामुळे साथीच्या रोगाचा फैलाव

बदलत्या हवामानामुळे साथीच्या रोगाचा फैलाव

तापमानात बदल होत असल्याने याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मिश्र हवामानामुळे दम्याचा त्रास अधिक जाणवत असून याशिवाय व्हायरल तापाच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांतर्फे नोंदविण्यात आले आहे.हवामानातील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम ही बाब सामान्य असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. प्रकृतीशी संबंधित कोणतेही रोगाचे लक्षण आढळल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना होत आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे साथीच्या रोगांचा फैलाव झपाट्याने होत आहे. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका हा लहान मुलांना बसत आहे. सर्दी, खोकला, ताप तसेच गालफुगीचा त्रास लहान मुलांना जाणवत असून लहान मुलांचे दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. वेळेवर लसीकरण करण्यात यावे तसेच घरामध्ये स्वच्छता ठेवून मुलांना बाहेरच्या अन्नपदार्थांपासून लांब ठेवावे असा आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version