महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या १० मध्ये नाहीत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या १० मध्ये नाहीत

दिल्लीचे हस्तक असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान असल्यामुळेच महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची अधोगती होत आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना कोणीही मुख्यमंत्री मानायला तयार नाही. देशातील पहिल्या १० मुख्यमंत्र्यांमध्येही त्यांचे नाव नाही, हे दुर्दैव आहे”.

राज्याच्या अधोगतीबद्दल राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरले आहे. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. मात्र, मागील सहा-सात महिन्यांत हे राज्य देशाच्या खिजगणतीतही नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. राज्याचा विकास काही जणांना पाहवत नाही. महाराष्ट्राचे पंख छाटण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांचा पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश होत होता. त्यानंतर ते चौथ्या क्रमांकावर आल्यामुळेच आकसापोटी माविआ सरकार पाडण्यात आल्याचे राऊत म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version