राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर

भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्याची इच्छा पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली होती. रमेश बैस हे नवे राज्यपाल असणार आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.

रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले होते. राज्यापालांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात होती. छत्रपतींचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी सुद्धा कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतला होती. त्यातच राज्यपालांनी स्वतःच मला पदमुक्त करावं अशी मागणी केल्यांनतर अखेर केंद्राने त्यांना मंजुरी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version