मोदींच्या दौऱ्यावरून पवारांची टीका

मोदींच्या दौऱ्यावरून पवारांची टीका

शुक्रवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १ महिन्याच्या आत दुसऱ्यांदा मुंबई दौरा झाला आहे. अनेक प्रकारच्या विकास कामासाठी नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. पारंतू त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून सडकून टिका केली जात आहेत. तर दुसरीकडे अमित शहा यांचे देखील महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. तसेच मुंबई आणि पुण्यात महापालिकांच्या निवडणुका या जवळ आल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया ही व्यक्ती केली आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार हे टीका म्हणाले आहेत की, मोदी आणि शाह यांना राज्यातील निवडणुका महत्त्वाच्या वाटत असाव्यात. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा मुंबई – पुणे दौरा करत आहेत. पण हरकत नाही. त्यांनी यावं. महाराष्ट्राला काही देणार असतील, महाराष्ट्राचं हित असेल तर विरोध करण्यास करण्याची गरज नाही. पण येऊन राजकीय भाषण करणार असतील तर त्याचा विचार त्यांनी करावा, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तर शरद पवार यांनी अमित शहांच्या पुणे दौऱ्यावर देखील खडसून टीका केली आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीसाठी पुण्यात दोन दोन दिवस घालवावे लागतात याचा अर्थ आमच्या कार्यकर्त्यांची कामे चांगली सुरू आहेत, असा चिमटा पवार यांनी काढला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version