पावणे दोन वर्षांनंतर देशमुख नागपुरात

पावणे दोन वर्षांनंतर देशमुख नागपुरात

न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचे आज नागपुरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर एकच गर्दी केली आहे. अनिल देशमुख 21 महिन्यानंतर त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी परतणार आहेत. त्यामुळं त्यांचं नागपुरातील निवासस्थान फुलांनी सजविण्यात आलंय. रंगरंगोटी, रोषणाई करण्यात आलीय. निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी करण्यात आलीय. दूपारी 3 वाजता त्यांचं नागपूरात आगमन झाल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

त्यावेळी अनिल देशमुख म्हणाले,” 21 महिन्यानंतर मी माझ्या नागपूर गावात येतोय. याचा मला अतिशय आनंद आहे. मला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आलं होतं. स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पाहून मोठा आनंद झालाय. मी काटोल मतदार संघात नव्हतो. परंतु, मुलगा सलील हा कायम नागरिकांच्या संपर्कात होता,” असे अनिल देखमुख यांनी म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version