‘मोदींनी मुंबईत घर घ्यावं’

‘मोदींनी मुंबईत घर घ्यावं’

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरातला हा मोदींचा दुसरा मुंबई दौरा आहे. त्यामुळे पुढील मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मोदींचे मुंबई दौरे होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर खोचक टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, जोपर्यंत महानगर पालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत कदाचित त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत राहू शकतो. कारण पालिका जिंकण्यासाठी मुंबई- महाराष्ट्रातले भाजपा व मिंधे गटाचे लोक असमर्थ आहेत. ते जिंकूच शकत नाहीत. अर्थात मोदी जरी आले किंवा इतर राज्यांत त्यांनी लावला तसा आख्खा देश जरी इथे लावला, तरी मुंबई महानगर पालिका शिवसेना जिंकेल याची पूर्ण खात्री असल्यामुळे आता मोदींचा पत्ता सारखा टाकला जात आहे. ते आहेत देशाचे पंतप्रधान व लक्ष कुठंय तर मुंबई महानगर पालिकेवर. याचा अर्थ इथले सगळे भाजपा व मिंधे गटाचे नेते नाकर्ते आहेत. म्हणून पंतप्रधानांना बोलवले आहे. कदाचित पंतप्रधान पालिका निवडणूक जिंकेपर्यंत मुंबईत घर घेऊन राहतील. राजभवनात राहतील, अस संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे संजय राऊत म्हणाले, मला पंतप्रधानांवर फार टीका करायची नाहीये. मी करू शकतो. पण दिल्लीत संसद सुरू असताना, अनेक महत्त्वाचे विषय सुरू असताना, अदाणीसारख्या विषयांवर विरोधकांनी घेरल असताना पंतप्रधान मुंबईत येत आहेत. वंदे भारत एक निमित्त आहे. पंतप्रधानांना मुंबई महानगर पालिका जिंकायची आहे. हे फार महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आम्ही इथे तयारीत आहोत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version