पंतप्रधानांच्या भाषणात विरोधकांचे अडथळे

पंतप्रधानांच्या भाषणात विरोधकांचे अडथळे

लोकसभेत मोदीच्या भाषणा दरम्यान काँग्रेसचा गदारोळ पाहायला मिळाला आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्यातील काही भाग काढून लोकसभेतील लोकशाही नष्ट झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आर्थिक घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी लोकसभेत काँग्रेस मार्फत करण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या भाषणात विरोधकांनी अडथळे निर्माण करण्यात आले. अदानी समूहाबाबत अमेरिकन आर्थिक संशोधन कंपनी हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी काँग्रेसने राज्यसभेत केली.

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वरिष्ठ सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत अदानी समूहाशी संबंधित आरोपांचा उल्लेख करत एवढ्या वेगाने संपत्ती वाढल्याचा सवाल करत ते म्हणाले की, अदानी समूहावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जेपीसी स्थापन करावी, तरच दूध का दूध आणि पानी का पानी होईल. अशी मागणी यावेळी कांग्रेस मार्फत करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version