राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर होणार आहे. साल २०२३-२४ मध्ये प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. २७ फेब्रुवारीपासून ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहणार आहे.

९ मार्च रोजी राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ८ मार्च रोजी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार असून जुन २०२२ मध्ये सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली आहेत. मात्र, अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळं फडणवीसांच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे या नवीन अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागलं आहे.

सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपसाठी हा अर्थसंकल्प अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण सत्तेत आल्यानंतर सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आहे, आणि त्याच बरोबर यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील लवकरच होणार आहेत. तसेच मुंबई, ठाणे, नागपूर महापालिकेसह अन्य महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या देखील निवडणुका होत आहे. त्यामुळे यासर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version