आदित्यचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा आव्हान

आदित्यचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा आव्हान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरळी मधून माझ्यासमोर विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले, परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. पण आता आपण दोघे राजीनामा देऊ तुम्ही वरळी जिंकून दाखवा अन्यथा ते हि जमत नसेल तर मी ठाण्यात येऊन लढतो असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले.

एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात कार्यक्रम असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. ‘‘मी छोटी नव्हे, मोठी आव्हाने स्वीकारून स्वत:ला सिद्ध करून दाखवतो. सहा महिन्यांपूर्वीच मी मोठे आव्हान स्वीकारले आणि जनतेच्या मनातले सरकार स्थापन केले’’, असं प्रत्युत्तर यावेळी एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं.

मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले की, “काल मी त्यांना सांगितलं होतं की, वरळीतून निवडणूक लढवून दाखवा. त्यावर काही उत्तर आलं नाही. तर मुख्यमंत्री जर वॉर्डमध्ये निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्यासमोर मी वॉर्डातही निवडणूक लढायला तयार आहे. मग मी त्यांना म्हटलं वरळीतून नाही, तर ठाण्यतून माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा. तिथे मी यायला तयार आहे. पण आज मी त्यांना अजून एक आव्हान देतोय. माझी पहिली आव्हानं त्यांना स्वीकारायची नसेल, आता एक नवं आव्हान देतो की, पुढच्या अधिवेशनाच्या आधी त्यांनी किमान राज्यद्रोही राज्यपालांना त्यांनी बदलून दाखवावं, असं नवं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version