शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

चिंचवड विधानसभा परिसरातून रॅली काढून भारतीय जनता पक्षाच्या वतीने अश्विनी जगताप यांनी आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सात फेब्रुवारी आहे.

शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढण्यात आली होती. चिंचवड विधानसभा परिसरात मिरवणूक देखील काढण्यात आली.

दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आदी उपस्थित होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version