‘उद्धव सरकारने कोकणासाठी काहीही केले नाही’

‘उद्धव सरकारने कोकणासाठी काहीही केले नाही’

आंगणेवाडी यात्रेत भराडीदेवीचं दर्शन घेतलं व तेथे भाजपची शनिवारी जाहीर सभा देखील पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला.

‘कोकणात रिफायनरी आणणार होतो. आजपर्यंत भारताच्या इतिहासात सर्वात मोठी 3 लाख कोटींची गुंतवणूक कोकणात येणार होती. सरकारी कंपन्या ही गुंतवणूक करणार होत्या. 1 लाख लोकांना रोजगार मिळणार होता, पण यांनी खोटं बोलून लोकांना भडकवलं गेलं, परंतु आता हा प्रकल्प आम्ही आणू. या प्रकल्पातून कोणतील तरूणांच्या हाताला रोजगार मिळेल. शिवाय या प्रकल्पामुळे पुढील 20 वर्षांची महाराष्ट्राची अर्थव्यस्था बळकट होईल. रिफायनरीच्या विरोधामुळं कोकणानं एक लाख रोजगार गमावला,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version