संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाचही जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र भाजपने प्रतिष्ठेचा बनविलेला नागपूर शिक्षक मतदारसंघ गमावला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप- शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीला दणका देऊन शानदार विजय मिळवला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपने पाठिंबा दिलेल्या नागो गाणार यांचा सात हजार मतांनी पराभव केला.
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे हेही विजयी झाले आहे.
तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघात मविआने पाठिंबा दिलेले धीरज लिंगाडे यांनी आघाडी घेतली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.