भाजपचा कोकणात पहिला विजय…

भाजपचा कोकणात पहिला विजय…

विधान परिषदेच्या शिक्षक जागेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, पहिला निकाल समोर आला असून, त्यात कोकण विधान परिषदेच्या जागेवरून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीकरून शेकापचे बाळाराम पाटील हे निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत दोन्ही गटांनी आपला विजय निश्चित असल्याचे दावे केले होते.

कोकण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना प्रथम पसंतीची २०,८०० मते मिळाली. त्यांनी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केला आहे. तर बाळाराम पाटील यांना ९ हजार ५०० मते मिळाली. राज्यात शिक्षक विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान झाले. कोणाची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये कोकणच्या जागेचा निर्णय आला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version