केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामण यांनी पॅन कार्डला आता अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक घोषणा केल्या. त्यामध्ये पॅन कार्डबाबतची घोषणा सर्वसामान्यांसह सर्वांना दिलासा देणारी ठरली आहे. यापुढे देशात पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत केली.
पॅन कार्डला राष्ट्रीय ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. यापूर्वी फक्त करभरणा प्रक्रियेसाठी पॅन कार्डचा वापर केला जात होता. ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड ग्राह्य धरले जात नव्हते. शेतकरी वर्ग तसेच आणि पॅनबाबत मोठी घोषणा, रेल्वेच्या कायापालटबाबतही सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.