केंद्रातील मोदी सरकार आज आर्थिक वर्ष 2023-2024साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीतील शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी सादर केला असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आपलं पाचव बजेट सादर करत आहेत. अमृतकाळातील हे पहिलं बजेट असल्याचं त्यांनी सांगितलं. तर या अर्थसंकल्पामुळे जागतिक स्तरावर भारताचं महत्त्व वाढणार असून कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे. देश वेगाने प्रगती करतोय केंद्रीय अर्थमंत्र्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी निर्मला सीतारामण म्हणाल्या की, सरकारच्या 2014 पासूनच्या प्रयत्नांमुळे सर्व नागरिकांचे जीवनमान सुनिश्चित झाले आहे. कोरोना काळातही अर्थव्यवस्था मजबूत, देश थांबला नाही त्यामुळे जागतिक स्तरावर भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे. तसेच उज्ज्वल भविष्याकडे भारत वाटचाल करत आहे. कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.