अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचं समजत आहे. बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. सत्ताधारी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राजकीय विरोधक आहेत म्हणून कोणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी सहन करणार नाही असं अजित पवार यांनी सांगितले आहे. सत्ता पक्षाकडून महागाई आणि बेरोजगारी वरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न केला जात आहे. असे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी कटकारस्थान होत असल्याचा आरोप केला होता. त्यावर खोट्या केस दाखल करणं महाराष्ट्राची परंपरा नाही. जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केल्यास सहन करणार नाही असं अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित होते त्यामुळे अनेक चर्चा होत होत्या अजित पवार यांनी या चर्चानां पूर्णविराम देत खासदार अमोल कोल्हे हे अमोल कोल्हे नाशिकच्या कार्यक्रमाला गेले आहेत. त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. असे अजित पवार म्हणाले. त्याच बरोबर अजित पवार यांनी आज झालेल्या संघर्षावर देखील भाष्य केले आहे. सत्तासंघर्षाबाबत तारीख पे तारीख होणारच कोर्टातील केसबाबत आपण काही बोलू शकत नाही असे अजित पवार म्हणाले.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version