‘शिवसेना एकसंध राहणार’

‘शिवसेना एकसंध राहणार’

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संजय राऊत यांच्या नाशिक दौऱयाच्या पहिले ठाकरे गटातील ५० पदाधिकार्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर संजय राऊत म्हणले. शिवसेना एकच आहे आणि एकच राहील. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली खरी शिवसेना आहे. ३५-४० लोक गेले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी ते म्हणाले की निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. त्याच्यावर विश्वास ठेवतो. सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास आहे. देशात संविधान, कायदा अजूनही जीवत आहे. राज्यात घटनाबाहय सरकार केंद्राच्या दबावापोटी घडविले आहे. तो डाव उधळला जाईल सरकार सर्व विषयावर बोलते मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर का बोलत नाही.

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राजकारण सुरू आहे. त्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर बोलत नसून इतर सर्व मुद्द्यांवर बोलतात, अशी टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर राज्यातील एखादया केंद्रीय मंत्र्याने राजीनामा देणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही, असेही ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version